Breaking News

रोह्यात भाजप शिवसेना युतीचा जल्लोष

रोहे ः प्रतिनिधी

राज्यात भाजप, शिवसेना युती होताच रोह्यातील राम मारूती चौकात दोन्ही पक्षाकडून जल्लेाष करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षाकडून पेढे वाटून आनंद व्यक्त करीत युतीच्या घोषणा देण्यात आला.

या वेळी भाजप नेते व समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव साळवी, शहर प्रमुख दिपक तेंडुलकर, नगरसेविका समिक्षा बामणे, युवा अधिकारी राजेश काफरे, तालुका महिला आघाडी संघटक निता हजारे,  भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा मेघना ओक, धनश्री बापट, सिमा कोनकर, संगिता फाटक, ज्योती कुमार, मिलींद जोशी, सुनिल कुमार आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या वेळी संजय कोनकर व अमित घाग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका केली.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply