Saturday , March 25 2023
Breaking News

ज्येष्ठ साहित्यिका वासंती ठाकूर ‘काव्य शारदा’ पुरस्काराने सन्मानित

चिरनेर : प्रतिनिधी

उरण येथील काव्य दरबार साहित्यिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा कै. प्रा. व्यंकटेश म्हात्रे स्मृती पुरस्कार जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिका वासंती ठाकूर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. सौ. ठाकूर या आजारी असल्याने हा पुरस्कार त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत मढवी, ए. डी. पाटील, हरिभाऊ घरत, तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ मढवी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नुकतेच दिवंगत झालेले तालुक्यातील ज्येष्ठ कवी एकनाथ मुंबईकर व आर. जे. ठाकूर यांना श्रद्घांजली अर्पण करण्यात आली.

शिक्षकी पेशातून निवृत्त झालेल्या ठाकूर यांची आतापर्यंत एकूण 11 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना उल्लेखनीय कार्याबद्दल 30 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.  धनंजय गोंधळी यांना कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल व प्रा. चंद्रकांत मढवी यांनी वकिलीची पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा या कार्यक्रमात शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुंडलिक म्हात्रे, रा. उ., प्रकाश ठाकूर, हरिश्चंद्र माळी, एकनाथ म्हात्रे, संजीव पाटील, भास्कर पाटील, अरुण दत्ताराम म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, धर्मा सरलेकर आदी कवी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply