माजी खासदार संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती
नवी मुंबई : बातमीदार
जीवन विद्या मशीन आणि एम्बिशन ट्युटोरिअल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा’ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी पालक यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमास ठाण्याचे माजी खा. संजीव नाईक साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन करताना आपल्या जीवनात यशस्वी होत असताना आपणास नशिबावर अवलंबून न राहता यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर आपणास कोणतीही गोष्ट अवघड नाही असे सांगितले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी बालकांसाठी यशस्वी जीवनाचा कानमंत्र त्यांनी आपल्या भाषणातून दिला. नाईक कुटुंबीय जीवन विद्या मिशन यांच्या कार्यक्रमांसाठी नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करीत असून इथून पुढेदेखील त्यांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले. युवा पिढीला घडविण्याचे मोठे काम या मिशनच्या माध्यमातून चालत असून हे राष्ट्र, ही तरुण पिढी चांगल्या विचारांनी बळकट करण्याचे काम आपल्या माध्यमातून चालत आहे आणि त्यास आमच्या शुभेच्छा कायम राहतील असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विविध विषयावर प्रमुख वक्त्या अल्पना काळोखे व वैशाली राणे यांनी मुलांच्या आणि पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास कल्पना नाईक, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका वैजयंती भगत, जीवन विद्या नवी मुंबई मिशनचे प्रमुख कार्यकर्ते वंदना पठाडे, राजेंद्र देशमुख, मंगेश वालकर, विजय नलावडे, जीवंविद्या मिशनचे सर्व युवा पदाधिकारी तसेच प्रताप महाडिक, संतोष मोरे, प्रशांत महाडिक, अश्विनी महाडिक, कमलेश मुळीक, शिवाजी राजिवडे, शुभांगी चिकणे, वासंती महाडिक, प्रमोद फडतरे, मंडलिक सर्व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.