Breaking News

मोबाइल अॅ8पद्वारे होणार पशूधन नोंदी ; राज्यातील 1284 छावण्यांत साडेआठ लाख पशूधन

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे जिल्ह्यांत 1284 राहत शिबिरे व छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यात लहान-मोठे मिळून 8,55,513 पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली व औरंगाबाद या चार जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थांनी स्वेच्छेने व स्वखर्चाने सहा छावण्या सुरू केल्या आहेत. या चारा छावण्यांत पशूधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी अँड्रॉइड प्रणालीवरील अ‍ॅप विकसित करण्यात आले असून, त्याचा वापर करण्याचे निर्देश छावण्यांना देण्यात आले आहेत.

चारा छावण्यांमधील पशूधनाच्या दैनंदिन उपस्थितीच्या नोंदीसाठी कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टीम (उरीींंश्रश उराि चरपरसशाशपीं डूीींशा) ही प्रणाली विकसित करण्यात आली असून ती छावणी चालकांना व्यवस्थापनासाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अ‍ॅपमध्ये छावणी चालकाला प्रथम छावणीतील पशूधनाची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर बारकोड असलेले टॅग जनावरांच्या कानास लावावे लागणार आहेत. छावणीतील जनावरांची दिवसातून एकदा संख्या मोजावी लागणार असून त्यासाठी बारकोड स्कॅन करावे लागणार आहेत. या नोंदीनुसारच चारा छावणी चालकांना शासनाच्या वतीने अनुदान दिले जाईल. बारकोड लावणे, अ‍ॅपमध्ये जनावरांची व छावणीची माहिती अपलोड करणे यासंबंधीचे प्रशिक्षण छावणी चालकांना देण्यात येणार आहे. दुष्काळी भागात शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांतील पशूधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी छावणीमधील जनावरांना बारकोड असलेले टॅग लावण्यात येणार आहेत. राज्यातील छावण्यांतील पशूधनाच्या आहारातही वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply