महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
पंचम निर्मीत गंध सुरांचा संगीत अकॅडमीचा चौथा वर्धापन दिन संगीतमय वातावरणात मंगळवारी (दि. 28) झाला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. मुलांना चांगली दिशा दाखवली तर त्यांचे व्यक्तीमत्व विकास होतो आणि तेच काम अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे. अशा शब्दांत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अकॅडमीचे कौतुक केले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, सिने अभिनेते पंढरीनाथ कांबळे, येऊ कशी कशी मी नांदायला ही मराठी सिरीयल फेम उमेश बने, अॅड. महेश देशमुख, गणेश भगत, ज्येष्ठ नेते हरीश्चंद्र भगत, महेश टिळक, प्रकाश पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.