उपाययोजना करण्याची भाजप पदाधिकार्यांची मागणी
खारघर : रामप्रहर वृत्त
सिडकोद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या खारघर शहरातील अनेक सोसायट्यांना पाण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी करून भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सिडकोचे सहाय्यक अभियंता राहूल सरोदे यांना निवेदन दिले आहे. खारघर शहरातील अनेक सोसायट्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. सेक्टर 15, 16, 19, 20, 13, 12, 07, 30, 11, 35, 05, 04 या विभातील सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, असे पटेल यांनी निवेदनात नमुद केले आहे. निवेदन देतेवेळी भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, लखवीरसिंग सैनी, गिरीश गुप्ता, अशोक जहांगीर, कृष्णा खडगी उपस्थित होते.