Breaking News

पनवेल महापालिकेतर्फे पार्लर प्रशिक्षण शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. त्या पार्श्वभुमीवर पनवेल आणि नवीन पनवेल येथील 60 महिलांना नवीन पनवेल येथील आयटीएम सेंटरमध्ये महिलांसाठी पार्लरचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या हस्ते झाले. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांना पार्लरचे प्रशिक्षण नवीन पनवेल येथील आयटीएम सेंटरमध्ये मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात पनवेल विभागातील 30 तर व नवीन पनवेल विभागातील 30 महिला अशा एकूण 60 महिलांना पार्लरचे प्रशिक्षण देण्यात येणार असून हे शिबिर महिनाभर सुरू राहणार आहे. या शिबिराचे सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी हे शिबिराचे आयोजन केल्याबद्दल महापौर डॉ. कविता चौतमोल आणि महिला बालकल्याण विभागाच्या सभापती हर्षदा उपाध्याय यांचे आभार मानले. या वेळी नगरसेविका सुशीला घरत, सुनीता माने, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply