Breaking News

आवास येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव

रेवदंडा : प्रतिनिधी

क्षात्रैक्य समाजाच्या वतीने आवास येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चौल पाचकळशी समाज अध्यक्ष सुरेश घरत (कोटकर) यांनी केले. आवास येथे 6 ते 9 जानेवारी 2023 मध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी (दि. 27)  सायंकाळी चौल येथील पाठारे क्षत्रिय समाज सभागृहात पंचक्रोशीतील शेतकरी व बागायतदारांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी सुरेश घरत (कोटकर) बोलत होते. आवास येथे आयजीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात विविध प्रकरचे शेतीमालाचे प्रदर्शन व विक्री त्याचबरोबर शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन शिबिर, चर्चासत्र, परिसंवादाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच विविध स्टॉल, बचतगटाच्या माध्यमातून अन्न पदार्थ, तसेच अन्य उत्पादने विक्रीची संधी मिळणार आहे. या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने कबड्डी, कुस्ती, शरिरसौष्ठव आणि बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती क्षात्रैक्य समाज सचिव प्रदिप नाईक यांनी या वेळी दिली. क्षात्रैक्य समाजाचे अध्यक्ष अविनाश राऊळ, सचिव प्रदिप नाईक, आगरी समाज नेते अनंत गोंधळी, भंडारी समाजाचे भास्कर चव्हाण, अशोक अंबूकर, सदानंद पडते, श्रीनाथ कवळे, मनोज राऊळ, रवींद्र वर्तक, अनंत घरत, नरेश म्हात्रे, सदानंद ठाकूर, आर. डी. नाईक, उदय नाईक, सुनिल नाईक, संतोष घरत, दिलीप राऊत आदींसह पाचकळशी समाज बांधव उपस्थित होते. अतुल वर्तक यांनी आभार मानले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply