Breaking News

जेएनपीएतील कंटेनर टर्मिनलचा ताबा भारतीय कंपनीकडे

उरण : प्रतिनिधी

जेएनपीएच्या मालकीच्या एकमेव उरलेल्या कंटेनर टर्मिनलचेही खासगीकरण झाले आहे. जेएनपीएने जागतिक स्तरावर काढलेल्या अंतिम सात कंपन्यांच्या निविदा प्रक्रियेत जे.एम.बक्सी.पोर्ट अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स प्रा.लि.मुंबईने बाजी मारली आहे. कंपनीची एका 20 फुटी कंटेनरच्या रॉयल्टीपोटी चार हजार 520 रुपये दराची निविदा यशस्वी ठरल्याने पुढील 30 वर्षांसाठी टर्मिनलचा ताबा प्रथमच एका भारतीय कंपनीकडे आला आहे.केंद्र सरकारने नफ्यात चालणारी सरकारी मालकीची बंदरे, प्रकल्प, विविध कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. याआधीच जेएनपीएने मालकीची चारही बंदरे बहुराष्ट्रीय कंपन्यांना खासगीकरणातून चालविण्यासाठी दिली आहेत. त्यानंतर जेएनपीएच्या मालकीच्या एकमेव उरलेल्या 680 मीटर लांबीच्या कंटेनर टर्मिनल पब्लिक, प्रायव्हेट,पार्टनरशिप (पीपीपी तत्वावर) खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. केंद्र सरकारने बंदराच्या या बंदराच्या खासगीकरणासाठी थेट जागतिक स्तरावर निविदा काढण्यात आल्या होत्या. जेएनपीएच्या कंटेनर टर्मिनलच्या खासगीकरण करण्यासाठी काढण्यात आलेल्या जागतिक स्तरावरील 12 पैकी 11 निविदा पात्र ठरलेल्या होत्या. निविदा प्रक्रियेत जे. एम. बक्सी.पोर्ट अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स प्रा. लि. मुंबई या भारतीय कंपनीची निविदा अव्वल ठरली आहे.या कंपनीने एका 20 फुटी कंटेनरच्या रॉयल्टीपोटी चार हजार 520 रुपये दर देण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर टर्मिनल इनव्हेसमेंट कंपनी लिमिटेड-लक्झेमबोर्ग ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे.या कंपनीने एका 20 फुटी कंटेनरच्या रॉयल्टीपोटी चार हजार 293 रुपये दर देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे जेएनपीएचे कंटेनर टर्मिनलचा ताबा पुढील 30 वर्षांसाठी निविदा प्रक्रियेत अव्वल ठरलेल्या जे. एम. बक्सी.पोर्ट अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स प्रा. लि. मुंबई यांच्याकडे जाणार असल्याची माहिती जेएनपीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मागील 33 वर्षांत जेएनपीए बंदरातील कंटेनर टर्मिनल पहिल्यांदाच एका भारतीय कंपनीच्या ताब्यात आले आहे.जेएपीएच्या मालकीच्या एकमेव उरलेल्या कंटेनर टर्मिनलचेही खासगीकरण झाले आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply