नवी दिल्ली : आपल्या घराचे स्वप्न पाहणार्यांना जीएसटी परिषदेने एक सुखद दिलासा दिला आहे. घरांवर लागणार्या वस्तू आणि सेवा करात मोठी कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. यानुसार निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर; तर परवडणार्या (अॅफोर्डेबल) घरांवरील जीएसटी 8 टक्क्यांवरून थेट एक टक्का करण्यात आला आहे. कररचनेतील या नव्या बदलानंतर बिल्डर्सना इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी दावा दाखल करता येणार नाही. जीएसटी परिषदेच्या रविवारी (दि. 24) झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी आम्ही हे बदल केले आहेत. यामुळे अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता येईल. बांधकाम क्षेत्राला या कपातीचा मोठा फायदा मिळणार आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper