रोहे : प्रतिनिधी
तालुक्यात उशीरा का होईना गुरुवारपासून दमदार पावसाने सुरूवात केल्यानंतर शुक्रवारी (दि. 1) मुसळधार पाऊस पडला. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने कोसळण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झाले होते. कृषीदिनी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रोहा तालुक्यातील शेतकरी सुखावले आहेत. रोह्यातील बळीराजा पावसाची वाट पाहत असताना शुक्रवारी वरुणराजाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. या मुसळधार पावसामुळे सकाळी शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांची व कामावर जाणार्या कामगारांची तारांबळ उडाली होती. संपुर्ण वातावरण काळोख व ढगाळमय होते. तालुक्यात पाऊसमय वातावरण झाले होते. हा पाऊस शेतीला पोषक असल्याने बळीराजा सुखावला आहे.