कर्जत : बातमीदार
सामजिक क्षेत्रात काम करणार्या थिंकशार्प फाउंडेशनकडून कर्जत तालुक्यातील भाकरीपाडा येथील प्राथमिक शाळेसाठी डिजिटल क्लासरूम आणि स्टडीमॉल साहित्य भेट देण्यात आले. भाकरीपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा भाकरीचापाडा येथील प्राथमिक शाळेला थींकशार्प फाउंडेशन या संस्थेने डिजिटल क्लासरुम, प्रोजेक्टर आणि स्टडीमॉल साहित्य भेट दिलेे. फाउंडेशनचे प्रमुख अमित कोतुळ आणि पष्टे यांनी भाकरीपाडा शाळेत जावून हे साहित्य शाळेचे मुख्याध्यापक यशवंत वाघरे यांच्याकडे दिले. त्यावेळी शिक्षक संभाजी केंगार, सुभाष जमदाडे, इंदिरा कोरडे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.