Breaking News

लग्नसराई व सुट्ट्यामुळे बसेसना तुंडब गर्दी

गर्मीमुळे प्रवाशी होतात हैराण

रोहे ः प्रतिनिधी  : शाळांच्या सुट्ट्या व लग्नसराई यामुळे सध्या लोकांची धावपळ सुरु असून, एसटी बसेस व अन्य खाजगी प्रवाशी वाहनांना तुंडब गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या पाहिल्याच आठवडयात सर्वत्र प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान,  वाढत्या उकड्याने सर्वच हैराण होत असून, घामाने अंगावरील कपडे भिजत आहेत. मे महिना म्हटले की, शाळेला सुट्टी पडल्यामुळे बच्चेकंपनी मामाच्या गावाला जायला उत्सुक असतात. तर नोकरी निमित्ताने बाहेरगावी असलेले चाकरमानी आपल्या गावी जात असतात. काहीजण पर्यटनाला निघतात. जत्रा, यात्रा या महिन्यात असल्याने अनेकांची पावले आपल्या गावाकडे वळताना दिसतात. त्यासाठी   मिळेल त्या वाहनांने ते प्रवास करीत असतात. त्यामुळे सध्या   सर्वत्र प्रवाशांची वर्दळ दिसून येत असून, बस व रेल्वे गाडया भरून जाताना दिसत आहेत. रोहा बस स्थानकही सोमवारी (दि. 6) प्रवाशांनी तुंडुब भरलेले दिसून आले. त्यातच सध्या लग्नसराई चालु असल्याने प्रवाशांच्या गर्दीत भर पडली आहे. त्यातच उन्हाचा तडाका असल्याने प्रवाशी गर्मीने हैराण होत आहेत.

रोहा तालुक्याच्या ग्रामीण भागात खाजगी वाहने नसल्याने तेथील प्रवाशी एसटी बसचा आधार घेत आहेत. तालुक्यातील भालगाव, सुतारवाडी, यशवंतखार सानेगाव, चणेरा या विभागात जाण्यासाठी प्रवाशी एसटी बसेसचा आधार घेताना दिसत आहेत.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply