Breaking News

स्मिथ, वॉर्नरही मायदेशी परतणार?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोना विषाणूमुळे भारतात परिस्थिती अधिकच खराब होत चालली आहे. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या आयपीएलवरही होत आहे. या स्पर्धेत खेळणारे ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू मायदेशी परतल्यानंतर आता अजून दोन खेळाडू ऑस्ट्रेलियात जाणार असल्याचे वृत्त आहे. सीमा बंद होण्याच्या आत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे खेळाडूही ऑस्ट्रेलियात जाऊ शकतात.
ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे सरकार भारताची सर्व उड्डाणे रद्द करणार आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसह सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सीमा बंद होण्यापूर्वी परत येऊ शकतात, अशी माहिती आयएनएसने दिली आहे.
यापूर्वी अ‍ॅण्ड्र्यू टाय, अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्ड्सन आयपीएल सोडून ऑस्ट्रेलियामध्ये परतले आहेत, तर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलने या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. बायो-बबलमध्ये पूर्णपणे सुरक्षित असल्याचे नाईलने सांगितले होते.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply