Breaking News

रायगडात वनविभाग करणार पाच लाख 25 हजार वृक्षांची लागवड

अलिबाग : प्रतिनिधी

राज्यात 7 ते 15 जुलै या कालावधीत वनमहोत्सव साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत रायगड जिल्ह्यात वनविभागामार्फत पाच लाख 25 हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणात होणारे बदल, निसर्गाचे बललेले रुतूचक्र, अनियमित पर्जन्यमान आणि दुष्काळ यामुळे वातावरणाचा समतोल ढासळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 7 ते 15 जुलै या कालावधीत राज्यभरात वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात रायगड जिल्ह्यात पाच लाख 25 हजार वृक्षांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्यासह सर्व शासकीय, निमशासकीय अस्थापना, ग्रामपंचायती या वृक्षलागवड उपक्रमात सहभागी होणार आहेत. तिनविरा येथील वनविभागाच्या नर्सरीत यासाठी रोपे तयार करण्यात आली आहेत. यात काजू, आंबा, कांचन, आवळा, फणस, खैर, बहावा, वड, जांभूळ, पुनई, चाफा, गुलमोहर आदी वृक्षरोपांचा समावेश आहे, अशी माहिती अलिबाग वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एच. पाटील यांनी दिली. या वृक्षलागवड कार्यक्रमात स्थानिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन वनविभागाने केले केले आहे.

वनमहोत्सवात यावर्षी रायगड जिल्ह्यात पाच लाख 25 हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट वनविभागाने ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. खड्डे ख़णून त्यांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. सामाजिक संस्थांनीही या उपक्रमात मोठा सहभाग देण्याची तयारी दाखवली आहे. नागरिकांनीही वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी पुढे येण्याची गरज आहे.

-आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक, वन विभाग-अलिबाग

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply