Breaking News

कर्जतच्या आदिवासी भागात पुन्हा मोबाइल युनिटची आरोग्य सेवा

कर्जत : बातमीदार

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील आदिवासी भागासाठी दोन फिरते दवाखाने चालविले जात होते. मात्र आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे पगार थकल्याने हा फिरता दवाखाना 2018 मध्ये बंद करण्यात आला होता. आता राष्ट्रीय आरोग्य अभियानने कर्जत तालुक्यातील कशेळे येथे मुख्यालय असलेले हा फिरता दवाखाना पुन्हा सुरू करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकार्‍यांना दिले आहेत, मात्र दहा दिवस लोटले तरी हा फिरता दवाखाना सुरु झालेला नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कर्जत तालुक्याच्या आदिवासी भागात 2012 पासून फिरता दवाखाना चालविला जात होता. एप्रिल 2018 पासून या युनिटची जबाबदारी पुणे येथील शतायुषी फाउंडेशनकडे देण्यात आली होती. पण पहिल्या दिवसापासून या फाउंडेशनेने पूर्ण महिन्याचा औषध पुरवठा कधीच पुरविला नाही. औषध साठा संपल्यानंतरही या फिरत्या दवाखान्यात रुग्णतपासणी करण्यात येत होती, पण औषध पुरवठा करीत नव्हती. त्यानंतर दोन्ही फिरत्या दवाखान्यातील वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी यांना फाउंडेशनकडून पगार देणे बंद झाले आणि 2018 मध्ये कर्जत तालुक्यातील दोन्ही फिरत दवाखाने बंद झाले. कर्जतचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांनी ऑगस्ट 2018 रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांना पत्र लिहून नॅशनल मोबईल युनिटबद्दल माहिती कळविली होती. डॉ. देसाई यांनी त्याबाबत आरोग्य संचालक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांना माहिती दिली होती. दरम्यान, कर्जत तालुक्यातील दोन्ही फिरते दवाखाने चार वर्षांपासून होते.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर कर्जत तालुक्यातील फिरते दवाखाने 1 जुलैपासून सुरू करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी दिले आहेत. ते का सुरू झाले नाहीत, याची चौकशी केली जाईल. तसेच दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई होईल.

-डॉ सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply