Breaking News

मोहोप्रे गावात जनावरांसाठी लसीकरण शिबिर

महाड : प्रतिनिधी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न आचळोली कृषी महाविद्यालय आणि महाड पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोप्रे येथे 29 जून रोजी जनावरांचे विशेष रोगप्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 308 पशुधनांचे लसीकरण करण्यात आले.

वातावरणातील बदल, आद्रता, पाऊस यामुळे जनावरांना घटसर्प, लाळ्या, खुरकूत, देवी, अंतरविषारी आदि विविध आजारांची लागण होते. या आजारांवर उपाय म्हणून कडत, एढत, ऋझ या लसींचा वापर करण्यात येतो. आचळोली कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक एस. एस. संकपाळ यांच्या मार्गदशनाखाली कृषिकन्या प्रतीक्षा डोंगरदिवे,  श्वेता जाधव, साक्षी गडहिरे, मायावती गेजगे, श्रुती घाग,  सुमेधा देवरुखकर, निकिता जमदाडे, रसिका जमदाडे, ऋतुजा लोणकर यांनी मोहोप्रे येथे जनावरांसाठी विशेष रोगप्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 51 गायी, 20 शेळ्या, 35 बैल, 202 कुक्कुट असे एकूण 308 पशुधनांचे लसीकरण करण्यात आले.

आचळोली कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लसीकरण शिबिरास डॉ. एस. व्ही. कलगुडे (पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, नाते), कृषी सहाय्यक प्रियंका सवणे, मोहोप्रे सरपंच ललिता म्हाके, कार्यक्रम समन्वयक प्रा. व्ही. आर. पवार, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. दिवाळे, प्रा. ए. वाय. महाजन, डॉ. होळकर, प्रा. के. एस. निकम यांच्यासह मोहोप्रे गावातील पशुपालक आणि शेतकरी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply