नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर
नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या वडाळे तलावाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. नवीन पनवेलकडून जुन्या पनवेल आणि अमरधामकडे जाणारा हा रस्ता सुस्थितीत असल्याने वाहन चालक व बाईक स्वार वेगाने गाड्या चालवत असल्याची बाब काही सतर्क नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी थर्मोप्लास्ट गतिरोधक बसविण्यात आले.
वडाळे तलावाच्या रस्त्यावर दुर्घटना होण्याची संभावना लक्षात घेऊन विक्रांत पाटील यांनी त्वरीत महापालिका अधिकार्यांशी बोलून या रस्त्यावर थर्मोप्लास्ट गतिरोधक लावण्यास सांगितले व त्यासंबंधी पत्र सुद्धा दिले. महापालिके विक्रांत पाटील यांच्या पत्राची दखल घेत त्वरित कायर्र्वाही केली. या रस्त्यावर थर्मोप्लास्ट गतिरोधक लावण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे नगरसेवक विक्रांत पाटील यांना नागरिकांनी धन्यवाद दिले.