Breaking News

शिरसे शिवसेना युतीकडे, तर पाथरज सर्वपक्षीय आघाडीकडे

कर्जत : बातमीदार/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील शिरसे आणि पाथरज दोन  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी (दि. 25) त्या मतांची मोजणी केली असता शिरसे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना युतीने वर्चस्व मिळविले असून, पाथरजचे थेट सरपंचपद सर्वपक्षीय आघाडीने मिळविले आहे.

रविवारी या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान झाले होते. पाथरज या 20 गावे-वाड्या यांचा समावेश असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतीमधील 13 पैकी 10 जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर एक जागा रिक्त राहिली होती. त्यामुळे तेथे सदस्यांच्या दोन जागांसाठी आणि थेट सरपंचपदासाठी निवडणूक झाली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप या पक्षांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 13पैकी 10 सदस्य बिनविरोध निवडले गेले होते. थेट सरपंच सर्वसाधारण महिला राखीव असून सर्वपक्षीय आघाडीच्या जोत्स्ना घोडविंदे यांनी हर्षदा रसाळ यांचा पराभव करून विजय मिळविला. घोडविंदे यांना  1783, तर रसाळ यांना 1486 मते मिळाली.

गेली 15 वर्षे बिनविरोध होत असलेल्या शिरसे ग्रामपंचायतीमध्ये या वेळी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात शिवसेना युतीच्या आरती संदीप भोईर यांनी मोठा विजय मिळविताना राष्ट्रवादी आघाडीच्या विमल डांगरे यांचा पराभव केला. भोईर यांना  1207, तर डांगरे यांना 282 मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेना युतीने एक जागा बिनविरोध जिंकली होती, तर निवडणूक झालेल्या सर्व 8 जागा जिंकून मतदारांनी संतोष मारुती भोईर यांच्या या ग्रामपंचायतीमधील 20 वर्षांच्या कामाची पोचपावती पुन्हा एकदा दिली.

ग्रामपंचायत निवडणूक निकाल

पाथरज ग्रामपंचायत

प्रभाग 1- जयाबाई रसाळ, गणेश मांगे, कविता कांबडी (सर्व बिनविरोध) प्रभाग 2- संजय पारधी-बिनविरोध आशा निलेश घोडविंदे-481 प्रभाग 3- गुलाब निर्गुडा, नामदेव पवार (सर्व बिनविरोध) प्रभाग 4- सुभाष सराई, भाग्यश्री सराई (सर्व बिनविरोध) प्रभाग 5- सतीश डांगरे,  ललिता लोहकरे (दोघे बिनविरोध) अतुल लोहकरे-497 मते

ग्रामपंचायत शिरसे

प्रभाग 1- भुर्‍या वाघमारे-391 मंजुळा डांगरे-379 गीता देशमुख-367 प्रभाग 2- पुंडलिक भोईर-362 शैला गुरव-369 ताई पवार-बिनविरोध प्रभाग 3- अर्चना वाघमारे-431 महेंद्र भोईर-394 कल्पना गायकवाड-453

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply