Breaking News

‘सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करावी’

नवी मुंबई ः बातमीदार

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे या आत्महत्येची खोलात जाऊन चौकशी करावी, अशी मागणी नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. कोणतेही पाठबळ नसताना संघर्षातून आपल्या कुशल अभिनयाने प्रत्येक भूमिका जिवंत करणार्‍या या अभिनेत्याने आपल्या कर्तृत्वाने कमी कालावधीत हिंदी सिनेसृष्टीत साम्राज्य बनवले. सर्वकाही ठीक असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत आहे. त्याच्या आत्महत्येबाबत सखोल चौकशी करण्याची गरज आहे. चौकशीत सत्य समोर येऊन कोणी दोषी असल्यास कठोर शिक्षा व्हायला हवी. बॉलीवूडमधील स्पर्धेचा हा अभिनेता बळी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या आत्महत्येची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी करणारे पत्र आमदार मंदा म्हात्रे यांनी गृहमंत्र्यांना दिले आहे.

Check Also

यंदाचा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील वर्षी नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याचप्रमाणे …

Leave a Reply