पनवेल : रामप्रहर वृत्त
आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने गुरुवारी (दि. 14) सायंकाळी 6.30 वाजता पनवेलमध्ये ’भेटला विठ्ठल माझा’ सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार्या या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेते सागर म्हात्रे यांचा विशेष सत्कार तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील निवडक गुरुजनांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या मैफिलत गायक मेघना भावे, नचिकेत देसाई, प्रणय पवार, वादक विवेक भागवत, मनीष डुंबरे, प्रणव हरिदास, समीर कर्वे, विशाल माळी, झंकार कानडे, तर निवेदक म्हणून स्नेहल दामले यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून मोफत प्रवेशिकेसाठी निखिल गोरे (8097248877) किंवा कौस्तुभ सोमण (9619441367) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …