पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील नेरे भागातील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो. त्या अंतर्गत नेरे विभागात मंगळवारी (दि. 12) वह्यावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, डॉ. रोशन पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री म्हसकर, स्कूल कमिटी अध्यक्ष काका गवते, माजी सरपंच वासुदेव गवते, जयंत मानकामे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घाडगे, माजी सदस्य सुवर्णा मगर, कविता गवते, युवा नेते राम पाटील, सुभाष पाटील, मेघनाथ पाटील, संजय बाळू पाटील, दत्ता पाटील, माजी सदस्य हेमंत मानकामे, माजी सदस्य गोटीराम म्हात्रे, अनंता पाटील, किशोर खारके, युवा मोर्चाचे सागर पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आयुष्यात प्रगती करायची असेल, तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसून शिक्षणाला महत्त्व द्या, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper