Breaking News

मराठी माणसाने उद्योजक बनण्याची तयारी ठेवावी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नवी मुंबईत आवाहन

नवी मुंबई : बातमीदार

मराठी माणसाने उद्योजक बनण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते नवी मुंबईत मराठी उद्योजकता दिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ना. नारायण राणे म्हणाले, राजनाथ सिंग यांच्या फोननंतर उध्दव ठाकरे रागावले असल्याचे कोणी पाहिले. ते एकटेच घरात होते. फार फार त्यांच्या पत्नीने पाहिले असेल. राजनाथ सिंग संरक्षणमंत्री आहेत. उध्दव ठाकरे कोण आहेत, काय त्यांचे अस्तित्व. त्यांना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत असल्याचं सांगत ना. राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. केंद्रीय मंत्री झाल्यावर एक वर्ष झालेय. सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग हे खात माझ्याकडे आहे. एका उद्योजकाच्या प्रतीक्षेत होतो, पण या ठिकाणी खूप सारे उद्योजक आहेत. हा उपक्रम उपयुक्त आहे. मराठी माणसाने उद्योजक व्हायची हिंमत केली पाहिजे. जे प्रशिक्षण घेतील, त्यांना कामांमध्ये प्राधान्य दिले जाईल. केलेच पाहिजे हा धर्म आहे. माझ कर्तव्य मी निभावणार. रोज शपथा घेऊन चालत नाही. त्या मनापासून केल्या पाहिजे. मराठी माणसाने अनेक गोष्टी इतर भाषिकांकडून शिकल्या पाहिजे. पैसा मिळवा. मग स्वतंत्र व्यवसाय करा. चेंबूरला व्यवसायिकांचे गुण मी पाहिजे. व्यवसायासाठी गोड बोलता आले पाहिजे. देशात सहा कोटी तीस लाख उद्योजक आहेत. त्यात मराठीचा टक्का कमी आहे. तो वाढविण गजरचे असल्याचे ना. राणे कार्यक्रमात बोलताना म्हणाले. या वेळी मनोज भटीर, रामदार माने, अशोक दोगाडे, विनित बनसोडे यांच्यासह मराठी उद्योजक प्रचंड संख्येने सभागृहात उपास्थित होते.

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे ना. राणे म्हणाले. मंत्रिमंडळ झालेय, ते लवकरच घोषित केले जाईल, असे सांगून संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही, कारण आज ते कोणी नाहीत, असे राणे म्हणाले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply