Breaking News

ग्रामपंचायतींच्या थकीत कराची समस्या त्वरित सोडवा -आमदार महेश बालदी

जेएनपीटी प्रशासनासोबतच्या बैठकीत मागणी

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील सोनारी, करळ, जसखार, नवघर, फुंडे, जासई, चिर्ले, धुतुम, पागोटे, हनुमान कोळीवाडा, नवीनशेवा या  एकूण 11 ग्रामपंचायतींच्या थकीत कराबद्दल उरणचे आमदार महेश बालदी यांनी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन ग्रामपंचायतींना मिळणार्‍या थकीत करा बद्दल चर्चा करून थकीत कर त्वरित मिळावे व अन्य समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी जेएनपीटी प्रशासनाकडे केली आहे.

जेएनपीटीच्या थकीत कराशी संबंधित असलेल्या सोनारी, करळ, जसखार, नवघर, फुंडे, जासई ग्रामपंचायतचे थकीत कर अजूनही ग्रामपंचायतींना मिळालेले नाही. तर दुसरीकडे चिर्ले, धुतुम, पागोटे, हनुमान कोळीवाडा, नवीन शेवा ही पाच गावे जेएनपीटीच्या हद्दीत येत नाहीत. त्यामुळे त्यांना जेएनपीटीतर्फे थकीत कर देता येणार नाही. असे जेएनपीटी प्रशासनाचे म्हणणे आहे. सोनारी, करळ, जसखार, नवघर, फुंडे, जासई, चिर्ले, धुतुम, पागोटे, हनुमान कोळीवाडा, नवीन शेवा या एकूण 11 गावांना थकीत कर मिळावा, असे महाराष्ट्र शासनाचे व रायगड जिल्हा परिषदेचे आदेश आहेत, मात्र 11 पैकी सहा ग्रामपंचायतींनाच थकीत कर देण्यास जेएनपीटी तयार आहे. उर्वरित पाच ग्रामपंचायतींना थकीत कर मिळत नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. एकूण 11 ग्रामपंचायतना थकीत कर मिळावे असे आदेश जिल्हा परिषदेनेही दिले आहेत.

गेल्या 12 वर्षांत जेएनपीटीच्या 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच कमिटीने उरण पंचायत समिती जिल्हा परिषद, महाराष्ट्र शासन, मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय येथे लढा देऊन आतापर्यंत 65 कोटी रुपयांचा कर वसुल करण्यात यश मिळविले आहे. 11 ग्रामपंचायत पैकी चिर्ले, धुतुम, हनुमान कोळीवाडा, नवीनशेवा, पागोटे या पाच ग्रामपंचायतींनाही थकीत कर मिळावा यासाठी  प्रयत्न चालू असल्याची माहिती जेएनपीटी प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायत समन्वय समितीचे निमंत्रक तुकाराम कडू यांनी दिली.

जेएनपीटी व ग्रामपंचायत यांच्यामध्ये झालेल्या समझोता करारा मधील त्रुटी दूर करण्याची मागणी या वेळी सर्वानुमते करण्यात आली असता समझोता करारातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन जेएनपीटी प्रशासनाने उपस्थितांना दिले आहे.

या  बैठकीस आमदार महेश बालदी यांच्यासह जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, वरिष्ठ प्रबंधक ढवळे, जनसंपर्क अधिकारी मनिषा जाधव, नवघरचे माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम कडू, सोनारी गावचे माजी सरपंच महेश नरेश कडू, जसखारचे सरपंच दामुशेठ घरत, नवीन शेवा गावचे सरपंच आदिनाथ भोईर, करळ सावरखार ग्रामपंचायतीचे सदस्य महेश घरत आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply