रोहा-चिपळूणदरम्यान 32 मेमू धावणार
रोहे : प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविकांच्या सोयीकरता मध्य रेल्वे सरसावली असून या काळात रोहा ते चिपळूण या दरम्यान 32 मेमू गाड्या धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील यांनी दिली. त्यामुळे गणेशभक्तांच्या कोकणातील प्रवास सुखकर होणार आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याची ओढ असते. त्यासाठी ते दोन महिने आधीपासून तयारीला लागतात. 2022 च्या गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे रोहा ते चिपळूणदरम्यान 32 मेमू गाड्या चालवणार आहे. या 32 जादा गाड्यांमुळे 2022 मध्ये गणपती विशेष गाड्यांची एकूण संख्या 198 होईल.
या जादा मेमू गाड्यांसाठी रोहा ते चिपळूण दरम्यान माणगांव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड हे थांबे असून सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या मेमू ट्रेनसाठी यूटीएस सिस्टमद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात. या मेमू ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES n डाऊनलोड केल्यास प्रवाशांना अधिक माहिती मिळणार आहे.
गणपती विशेष मेमू गाड्यांचे वेळापत्रक
रोहा ते चिपळूण (गाडी नंबर 01157)
19 ते 21 ऑगस्ट, 27 ऑगस्ट ते 5सप्टेबर आणि 10 ते 12 सप्टेबर (एकूण 16 सेवा) रोहा येथून रोज 11.05 वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी 13.20 वाजता पोहोचेल.
चिपळूण ते रोहा (गाडी नंबर 01158)
चिपळूण येथून 19 ते 21 ऑगस्ट, 27 ऑगस्ट ते 5 सप्टेबर आणि 10 ते 12सप्टेबर (16 सेवा). चिपळूण येथून रोज 13.45 वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी 16.10 वाजता पोहोचेल.