पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये बुधवारी (दि. 13) सकाळपासूनच तुफान पावसाने हजेरी लावली. मुसळधार पडत असलेल्या या पावसामुळे पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट नंबर येथे असलेले एक उंबराचे झाड मुळासकट कोसळले आहे. या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एक गाडी वर ते पडले असल्याने गाडीचे नुकसान झाले आहे, तसेच झाडाला लागून असलेली भिंती ही पडली आहे. झाड पडल्याची घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अनिल भगत यांनी तत्काळ एमएसईबी अधिकारी आणि अग्नीशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार अग्नीशमन दल घटना स्थळी दाखल होत झाड बाजूला काढले. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे नद्या व नाल्या तुडुंब भरल्या असून अनेक नद्यांनी नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.