पनवेल : वार्ताहर : कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे दि इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत सीबीएसईचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या हस्ते केले. या वेळी उपस्थित मुखाध्यापक अलका मोहंती, रचना नायर, शीतल शेलार, शिरीन मुकादम, एस. व्ही. कॉलेज तळोजाचे प्राचार्य महाजन सर, तसेच मा. सरपंच खोबाजी पाटील, विहिघर हायस्कूलचे चेअरमन पंढरीशेठ फडके, बबन नामा पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …