पनवेल ः रामप्रहर वृत्त
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विठ्ठल नामाचा गजर गुरुवारी घुमला. भाजप उत्तर रायगड जिल्हा सांस्कृतिक सेलतर्फे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त ‘भेटला विठ्ठल माझा’ हा सुश्राव्य गाण्यांच्या मैफिलेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांना उदंड प्रतिसाद लाभला.
आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने गुरुवारी (दि. 14) पनवेलमध्ये भेटला विठ्ठल माझा सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेते सागर म्हात्रे यांचा विशेष सत्कार तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील निवडक गुरुजनांचा सत्कार करण्यात येणार आला. या मैफिलीत गायक मेघना भावे, नचिकेत देसाई, प्रणय पवार यांनी सुरेल गिते सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तसेच त्यांना वादक विवेक भागवत, मनीष ठुंबरे, प्रणय हरिदास, समीर कर्वे, विशाल माळी, झंकार कानडे, यांनी साथ दिली.
या वेळी पनवेल महापलिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, भाजप सांस्कृतिक सेलचे कोकण प्रांत संयोजक राहुल वैद्य, सह संयोजिका अक्षया चितळे, सहसंयोजक दीपक पवार, सांस्कृतिक सेलचे प्रदेश सदस्य सुनील सिंन्हा, प्रदेश सहसंयोजक मकरंद पाटील, सांस्कृतिक सेल जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, संजीव कुलकर्णी, सदस्य अमोल खैर, शहर संयोजक निखिल गोरे, वैभव बुवा यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.