Breaking News

पनवेल महापालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी अर्ज दाखल

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी बुधवारी (दि. 8) सत्ताधारी भाजपच्या चार सदस्यांनी आपले अर्ज नगर सचिवांकडे दाखल केले. विरोधकांकडून सभापतिपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीचा निकाल 10 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

पनवेल महापालिकेच्या 2017मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर महापालिका क्षेत्रात अ, ब, क आणि ड अशा चार प्रभाग समित्यांचा निवडणूक कार्यक्रम नगरसचिवांनी जाहीर केला होता. त्याप्रमाणे काल सत्ताधारी भाजपतर्फे प्रभाग क्रमांक ‘अ’मध्ये प्रभाग नगरसेवक शत्रुघ्न काकडे, ‘ब’मध्ये नगरसेवक संजय भोपी, ‘क’मध्ये नगरसेवक गोपीनाथ भगत आणि ‘ड’मध्ये नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी महापालिका नगरसचिवांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.

या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभापती दर्शना भोईर, विद्या गायकवाड, डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेवक जगदीश गायकवाड, एकनाथ गायकवाड, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, अजय बहिरा, अमर पाटील, प्रवीण पाटील, अनिल भगत, संतोष शेट्टी, नगरसेविका मुग्धा लोंढे, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, सीता पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply