उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
अंत्योदय मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या मोहिमेचा एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींना त्यांचे प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्रे तातडीने मिळावीत यासाठी जिल्हा रुग्णालय अलिबागमार्फत इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबिर मंगळवारी (दि. 12) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपेर्यंत आयोजित करण्यात आले होते.
जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग आयोजित उरण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांगत्वाचे वैदकीय प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या शिबिरात अस्थिव्यंग नेत्र विकार व मानसिक आजार याची तपासणी केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गौतम देसाई, सहाय्यक अधिक्षक अनिल ठाकूर यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी झाले त्यात अलिबाग येथील सोशल वर्कर प्रतिमा फडतरे, ग्रामीण रुग्णालय टीम, अलिबाग जिल्हा सामान्यरुग्णालय टीम ने विशेष मेहनत घेतली.
या शिबिरात मानसिक विभाग 16 प्रमाणपत्र वाटप, अस्थिव्यंग 17 प्रमाणपत्र वाटप, मानसिक आजार चार प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. एकूण 56 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.उरण तालुक्यातील दिव्यांगांनी तपासणी व प्रमाणपत्र ज्यांना पाहिजे असेल त्यांनी थथथ.डुर्रींश्ररालरपलरीव.र्सेीं.ळप वर नोंदणी करावी, असे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. गौतम देसाई यांनी सांगितले.