Breaking News

‘लायन्स’च्या नवी मुंबईतील क्लबचा पदग्रहण सोहळा

उरण : वार्ताहर

लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई आगरी कोळीवाव लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी या तीनही क्लबच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य दिव्य समारंभ गोरक्षनाथ मंदिर येथे झाला.

गतवर्षीचे अध्यक्ष एमजेएफ मिलिंद पाटील, श्रीकांत पाटील व संदीप म्हात्रे यांनी पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमात सर्व लायन्सच्या डिस्ट्रिक पदाधिकार्‍यांना आमंत्रित केले होते. यावर्षीचे लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्सच्या नवनियुक्त अध्यक्ष गौरी देशपांडे, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई आगरी कोळीचे नवनियुक्त अध्यक्ष महेंद्र सुतार व लायन्स क्लब ऑफ द्रोनागिरीचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप म्हात्रे यांचे लिओ क्लब ऑफ द्रोनागिरीच्या कलाकारांनी ढोल ताशाच्या गजरात धुमधडाक्यात स्वागत केले.

पदग्रहण सोहळ्याचे इंडक्शन ऑफिसर पीएमजेएफ एन. आर. परमेश्वरन,  प्रमुख पाहुणे व इन्स्टॉलेशन ऑफिसर पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ अनिल जाधव यांची उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथी मुंबई एपीएमसी अध्यक्ष राजेंद्र पाटील व झोन चेअरपर्सनला रमाकांत म्हात्रे यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना केली. एमजेएफ विजय पाटील यांनी नवी मुंबई आगरी कोळी क्लबच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. संदीप म्हात्रे यांनी लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. तीनही क्लबच्या वतीने रायगड मधील सहा अंगणवाडींना शैक्षणिक खेळणी व साहित्य देऊन संयुक्तपणे स्तुत्य उपक्रम करण्यात आला.

नवनिर्वाचित अध्यक्षला गौरी देशपांडे यांनी आपल्या पदस्वीकृती अध्यक्षीय भाषणात नाविन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम करणार असल्याचे जाहीर केले . तसेच दोन्ही क्लबच्या अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्या पुढील उपकर्माबद्दल माहिती दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply