Breaking News

मुंबईत कार्यरत नवी मुंबईकरांमुळे कोरोनाचा धोका

मुंबईतच वास्तव्याची तरतूद करावी; महापौर जयवंत सुतार यांची मागणी

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नवी मुंबईत वास्तव्यास असणारे अनेक आरोग्य अधिकारी, नर्सेस, बँक कर्मचारी मुंबई महापालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अशा कर्मचार्‍यांची मुंबईतील कार्यरत असलेल्या त्याच ठिकाणीच वास्तव्याची तरतूद करावी, अशी मागणी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 145 रुग्ण कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांची वर्गवारी पाहिल्यास मुंबई क्षेत्रातून लागण झालेले डॉक्टर्स, नर्सेस, अ‍ॅम्ब्युलन्स वाहनचालक व वॉर्डबॉय अशी आहे. 145 पैकी 55 ते 57 सर्व रुग्ण नवी मुंबईत राहणारे आहेत. मुंबईत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना धोका वाढला आहे. मुंबईच्या बाजूलाच नवी मुंबई असल्याने मुंबईतील अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी-अधिकारी ये-जा करतात. ही बाब लक्षात घेता मुंबईत कार्यरत असणारे डॉक्टर्स, नर्सेस, वाहनचालक, बँक कर्मचार्‍यांना मुंबईतच वास्तव्याची तरतूद करावी व असे कर्मचारी नवी मुंबईत येऊ नयेत याकरिता प्रतिबंध करून ती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेस द्यावी, जेणेकरून नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येईल. याविषयी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply