मुंबई : पारेख अॅल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीशी संबंधित झालेल्या पैशांच्या अफरातफरप्रकरणी (मनी लॉण्डरिंग) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी (दि. 14) मुंबईतील रक्षा बुलियन आणि क्लासिक मार्बल्स यांच्या चार ठिकाणी छापे टाकले. या वेळी एकूण 431 किलो सोने-चांदी जप्त करण्यात आली. सन 2018मध्ये पारेख अॅल्युमिनेक्स लि. कंपनीविरुद्ध 2296 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक आणि मनी लॉण्डरिंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रक्षा बुलियन्स आणि क्लासिक मार्बल्स यांच्यात काही आर्थिक व्यवहार समोर आले. त्यानुसार ईडीने दोघांशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …