सुकापूर येथे रास्त भाव दुकानाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
तुमच्या कामाचे लोक उदाहरण देतील अश्या स्वरुपाचे काम महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 25) रास्त भाव दुकानाच्या उद्घाटनावेळी केले. सुकापूर येथे जय अंबे महिला बचत गटाने सरकार मान्य रास्त भाव दुकान सुरु केलं आहे. या दुकानाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश प्रगतीच्या दिशेने जात आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात ते करतात त्यामुळे देशातील जनता त्यांच्या पाठीशी असून, सर्व सामान्य जनतेचा विचार करणारा पंतप्रधान आपल्याला भेटला आहे. पुर्वी कोणतीही विचारपूस न करता बोगस पद्धतीने रेशनच्या दुकानावर धान्य दिले जात होते त्यामुळे ज्याला गरज होती त्याला याचा लाभ होत नव्हता, मात्र आत्ता बायोमॅट्रीक आधारे नोंद करून धान्य दिले जात असल्याने तळागळातील गरजूला याचा लाभ पोहचत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजना ह्या सर्व नागरिकांपर्यत्त पोहचल्या पाहिजेत, तसेच त्यामुळे जय अंबे महिला बचत गट केंद्र सरकार जी मदत करते ती मदत महिलांपर्यंत व त्यांच्या कुटूंबीयांपर्यंत पोहचवण्याचे केंद्र हे दुकान ठरेल यासाठी प्रयत्न करा.
या रास्त भाव दुकानाच्या उद्घाटनावेळी जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूरच्या सरपंच योगिता पाटील, माजी उपसरपंच आळुराम केणी, माजी उपसरपंच दत्तात्रेय भगत, माजी सदस्य परशुराम पाटील, चाहु पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, प्राची जाधव, ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील, हनुमंत खुंटले, आनंद म्हसकर, चांगदेव ठाकूर, डॉ. कृष्ण देसाई, भाजपचे पं. स. विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, विभागीय सरचिटणीस उदय म्हसकर, गाव अध्यक्ष राजेश पाटील, जगन्नाथ पाटील, नारायण पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, सुरेश मुकादम, भाऊ पाटील, भरत म्हसकर, प्रमोद भगत, अमित पाटील, वासुदेव पाटील, जय अंबे महिला बचत गटाच्या अध्यक्ष संगीता पाटील, जनाबाई ठाकूर, खजिनदार मनीषा पाटील, निलेशा पाटील, वैशाली पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.