Breaking News

रायगडमध्ये रंगणार आरपीएल टी-20 स्पर्धा

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्हा प्रीमियर लीग कमिटीतर्फे येत्या नोव्हेंबर महिन्यात आरपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. त्याची घोषणा आयोजकांतर्फे गुरुवारी (दि. 8) अलिबाग येथे करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील माळी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या वेळी आरपीएल स्पर्धेचे अधिकृत  बोधचिन्ह,  वेबसाइट, फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटचे उद्घाटन करण्यात आले.रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील 25 वर्षांखालील खेळाडू स्पर्धेसाठी पात्र असतील. खेळाडूंची ऑनलाइन माहिती मागविण्यात येईल. स्पर्धेत आठ संघ असतील. संघांचे मालक  लिलावाद्वारे  खेळाडूंची निवड करतील. ज्या खेळाडूंची निवड लिलावाद्वारे झाली नसेल अशा खेळाडूंनादेखील स्पर्धेत खेळण्याची संधी दिली जाणार आहे, अशी माहिती रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी या वेळी दिली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply