Breaking News

नवी मुंबईत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेस प्रारंभ

नवी मुंबई ः बातमीदार

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा पारिषदेच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेरूळ येथील कै. यशवंतराव चव्हाण क्रीडागंणातील फुटबॉल मैदानात 25 ते 29 जुलै या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील विजेते संघ मुंबई विभागीय स्तरावरील पुढील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा ही 14 वर्षाआतील मुले व 17 वर्षाआतील मुले व मुली या वयोगटात होणार असून यामध्ये नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील 40हून अधिक शाळांनी सहभाग नोंदविलेला आहे. या स्पर्धेचा शुभारंभ 25 जुलै रोजी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या हस्ते झाला. उद्घाटन समारंभास जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन कमिटीचे सदस्य धनंजय वनमाळी, पुरुषोत्तम पुजारी, महापालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, अभिलाषा म्हात्रे उपस्थित होते. स्पर्धेकरिता विविध शाळांमधील क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply