Breaking News

भाजप कामगार आघाडी जिल्हा चिटणीसपदी निलेश पिंपरकर

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे तरुण कार्यकर्ते आणि भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष निलेश पिंपरकर यांची भाजप कामगार आघाडी जिल्हा चिटणीसपदावर निवड करण्यात आली आहे.

 कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून टेम्बरे ग्रामपंचायतमधील कार्यकर्ते निलेश पिंपरकर यांनी चार वर्षे चांगली कामगिरी केली. युवा मोर्चाचे चांगले संघटन पिंपरकर यांनी केले असून त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कामगार सेलमध्ये जिल्हा चिटणीस करण्यात आले आहे. जिल्हा चिटणीसपदाची जबाबदारी भाजप कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देऊन देण्यात आली. या वेळी भाजप कामगार सेलचे सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, समीरा चव्हाण यांच्यासह कामगार सेलचे कर्जत तालुका अध्यक्ष रमेश कडव, सूर्यकांत देशमुख, अरुण घोडके, रवींद्र कोरडे, मारुती धुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply