लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्याध्यापक सुरेश पाटील यांना सेवानिरोप
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश काशिनाथ पाटील 35 वर्षे प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 27) सुरेश पाटील यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विद्यालयातील सुसज्ज कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन करण्यात आले. सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात मुख्याध्यापक सुरेश पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. या वेळी सुरेश पाटील यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार सत्कार करण्यात आला. या समारंभास सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, मराठी माध्यमचे चेअरमन शरद खारकर, एम. डी. खारकर, पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, ‘रयत’चे सहाय्यक निरीक्षक शहाजी फडतरे, प्रा. बोरगावे, पी. ए. कोळी, साधना खटावकर, मुक्ता खटावकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात सुसज्ज कॉम्प्युटर लॅब सुरू झाली आहे. या लॅबचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. नव्याने सुरू झालेल्या या लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान घेता येणार आहे.