Breaking News

सानपाड्यातील नाला कायमस्वरूपी बंदिस्त करा

भाजपच्या सुनील कुरकुटे यांची मागणी

नवी मुंबई : बातमीदार

सानपाडा सेक्टर 9 येथील मिलेनियम टॉवर ते सेक्टर 11 येथील एलोरा फिएस्टापर्यंतचा नाला कायमस्वरूपी बंदिस्त करण्यासाठी भाजपचे माजी ’ड’ प्रभाग समिती सदस्य सुनील कुरकुटे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र दिले.

सानपाडा सेक्टर 9 येथील मिलेनियम टॉवर ते सानपाडा – जुईनगर सेक्टर 11 येथील एलोरा फिएस्टा टॉवरपर्यंत मागील बाजूला असलेला नाला उघडा असल्याने आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे.

या नाल्यात आजूबाजूच्या सोसायटीतील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडले जाते. हा नाला पुढे मोठ्या नाल्याला जाऊन मिळतो, तसेच एमआयडीसीतील केमिकल युक्त रसायन या मोठ्या नाल्यात सोडले जाते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. या दुर्गंधीचा परिसरातील रहिवाशांना मोठा सामना करावा लागत असून दुर्गंधीमुळे रहिवाशांचे आरोग्य आता धोक्यात आले असल्याचे कुरकुटे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पावसाळ्यात या नाल्यातून पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने अनेकदा नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी कुरकुटे यांच्याकडे सातत्याने तक्रारी केल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सानपाडा सेक्टर 9 येथील मिलेनियम टॉवर ते सानपाडा – जुईनगर सेक्टर 11 येथील एलोरा फिएस्टा टॉवर पर्यंत मागील बाजूला असलेला नाला कायमस्वरूपी बंदिस्त करावा, अशी मागणी कुरकुटे यांनी आयुक्तांना पत्रातून केली आहे; अन्यथा स्थानिक रहिवाशांना सोबत घेऊन महापालिकेच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा कुरकुटे यांनी आयुक्तांना पत्रातून दिला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply