‘त्या’ खुनाचा उलगडा करण्याचे पोलिसांपुढे आव्हान

पनवेेल : वार्ताहर

पनवेलजवळील पळस्पे ते जेएनपीटी या एनएच 4 बी महामार्गावर डोंबाळे कॉलेजसमोर असलेल्या पुलाखाली 15 दिवसांपूर्वी एका इसमाचा अज्ञात कारणावरून अज्ञात आरोपींनी खून केला होता. या खुनाचा अद्यापही उलगडा न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोेद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) निशिकांत विश्वकार व त्यांचे पथके वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेत आहेत. मयताचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला असून, डोक्यावर व चेहर्‍यावर मार बसल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांना कठीण झाले आहे. निश्चितच हा खून असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने परिसर पोलिसांनी पिंजून काढला. त्या ठिकाणी चालू असलेली विविध बांधकामे, झोपडपट्टी आदी ठिकाणी घराघरात जाऊन पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, तसेच पनवेल शहर, तालुका, उरण, कर्जत, खोपोली, खालापूर, पेण आदी भागातील कोणी व्यक्ती हरविली आहे का? व त्याची नोंद आहे का? याचीसुद्धा तपासणी सुरू आहे. मृत व्यक्तीचे हाताचे ठसे घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे. आधारकार्ड मार्फतसुद्धा तपास सुरू असून, काही तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन मृतदेहाच्या कवटीचा अभ्यास करून त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा मूळ चेहरा रेखांकित करून त्या आधारे माहिती मिळविण्याचादेखील प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्याप यश आलेले नाही.

कोणत्याही परिस्थितीत या खुनाचा छडा लावायचा आहे. या दृष्टीने पनवेल शहर पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. सध्या तरी हा खून म्हणजे पोलिसांसाठी आव्हानात्मक दिसत आहे.

Check Also

Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?

Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …

Leave a Reply