भाजपच्या आनंद ढवळे यांचा पुढाकार
पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील ओएनजीसी ते शिवकर मोहा रस्त्याला जोडणार्या पुलावर पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजविण्याचे काम युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे यांनी केले आहे. त्यामुळे अखेर खड्डे बुजले …आनंद ढवळे यांचा पुढाकाराने अशी समाधानकारक प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पनवेल महामार्गाला लागून ओएनजीसी मार्गे शिवकर मोहा रस्ता आहे. या रस्त्याला जोडणारा एक पूल असून पावसाळ्याच्या जोराने खड्डे पडले होते. त्यामुळे येथील वाहनचालक, प्रवासी व पादचार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. आणि विशेषत्वाने शिवकर ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून उल्लेखित आहे. या ठिकाणी शेकापची सत्ता आहे, मात्र विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बोंबाबोंब पहायला मिळते. या ठिकाणी ग्रामपंचायतींनीही खड्डे बुजवण्यास पुढाकार न घेतल्याने अखेर युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे व त्यांच्या सहकार्यांनी स्वखर्चाने या पुलावरील खड्डे काँक्रीट पद्धतीने बुजवले.
याकामी आनंद ढवळे यांना मारुती पाटील, तुकाराम टोपले, जगदीश ढवळे, भरत पाटील, नामदेव तुपे, धर्मा तुपे, अक्षय पाटील, अरविंद माळी, प्रांजल पाटील, अमित पाटील, मच्छींद्र तुपे, जीलानी शेख यांचेही सहकार्य लाभले. त्यामुळे आनंद ढवळे व सहकार्यांचे ग्रामस्थ तसेच वाहनचालक, प्रवाशांनी आभार व्यक्त केले.