Breaking News

पनवेल येथे कोविड रुग्णालय सज्ज

अलिबाग : जिमाका
पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना कोविड-19 रुग्णालयाची स्थापना करण्यात आली असून, हे 120 खाटांचे रुग्णालय आता जिल्हा कोविड रुग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच या रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार अमित सानप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले सोबत होते.
पूर्णतः विलगीकरण कक्ष असलेले हे रुग्णालय सर्वतोपरी सुसज्ज ठेवण्यात आले आहे. या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणार्‍या रुग्णांना तपासणीसाठी व प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या महापालिकेच्या क्लिनिकमध्ये, तर प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांना नजीकच्या एमजीएम इस्पितळात पाठविले जाणार आहे. याकरिता एमजीएम रुग्णालयाचे मुख्य विश्वस्त सुधीर कदम आणि या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सलगोत्रा यांच्याशीही चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply