Breaking News

नेरूळ पारिजात संस्था सर्वोत्तम शाखा पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः वार्ताहर

नवी मुंबईमधील अग्रगण्य पारिजात को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. नवी मुंबई संस्थेच्या एकूण दहा शाखांपैकी सन 2021-22 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट ग्राहक सेवा, ठेव संकलन व कर्ज वसुली या विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या नेरूळ शाखेस संस्थेचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ व संचालक मंडळ यांच्या शुभ हस्ते सर्वोत्तम शाखा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नेरूळ शाखेचे शाखाधिकारी, कर्मचारी, दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी त्याचा स्वीकार केला व हा पुरस्कार नेरुळ शाखेच्या सर्व कर्मचारी वर्ग, दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नांचा व नेरुळ शाखेच्या सभासदांच्या सहकार्याचा बहुमान असल्याचे उदगार नेरुळ शाखेचे शाखाधिकारी संतोष जाधव यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले. वाशी येथे पार पडलेल्या या रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेचे मान्यवर सभासद उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply