Breaking News

नवी मुंबईत विद्यार्थी युनिटची स्थापना

नवी मुंबई ः बातमीदार

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 16व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाशी, सीबीडी बेलापूर येथील महाविद्यालयात सोमवारी (दि. 1) विद्यार्थी युनिटची स्थापना करण्यात आली. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनविसेचे सरचिटणीस संदिप पाचंगे यांच्या हस्ते वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, राजीव गांधी महाविद्यालय, मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालय तसेच सीबीडी बेलापूर येथील भारती विद्यापीठ महाविद्यालय येथे विद्यार्थी युनिटचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, मनसे महिला सेना शहर अध्यक्षा डॉ.आरती धुमाळ, उपशहर अध्यक्षा दिपाली ढऊल, मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे विभाग अध्यक्ष भूषण कोळी, सागर विचारे, योगेश शेटे, विक्रांत मालुसरे, मनविसे उपशहर अध्यक्ष निखिल गावडे, प्रशांत पाटेकर, दशरथ सुरवसे, मनविसे शहर सचिव समृद्ध भोपी, मनविसे विभाग अध्यक्ष विशाल भणगे उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply