नवी दिल्ली : रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मोठं भाकीत केलं आहे. यामुळे विरोधकांचं मनोधैर्य खचू शकतं आणि भाजप समर्थकांमध्ये नवा उत्साह संचारू शकतो. भाजप पुढील अनेक दशके हटणार नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सलग 40 वर्षे सत्तेत होती. आज भारतीय राजकारणात अशीच स्थिती भाजपची आहे. जनता नाराज आहे आणि पंतप्रधान मोदींना उलथवून टाकेल, असे काहींना वाटत असेल. तर असं अजिबात होणार नाही. अंगदने पाय रोवला होता, तसाच पाय भारतीय राजकारणात भाजपने रोवला आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गुजरात आणि गोवा या पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Check Also
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …
RamPrahar – The Panvel Daily Paper