Breaking News

रामशेठ ठाकूर स्कूलचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सिबीएसईच्या विद्यार्थ्यांनी विविध जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवतील यश मिळवले आहे. या यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या चौथीमधील प्रिशा कोंढाळकर हिने 26 जुलै 2022 रोजी झालेल्या तालुका स्तरीय निमंत्रित स्पर्धेमध्ये 10 वर्षांखालील मुलींच्या गटात 50 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. त्याच प्रमाणे 31 जुलै 2022 रोजी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल येथे झालेल्या जिल्हा स्तरीय स्विमिंग स्पर्धेमध्ये 50 मीटर फ्रीस्टाईल, 50 मीटर ब्रेस्ट, 50 मीटर बॅकस्ट्रोक व 50 मीटर बटरफ्लाय या प्रकारा मध्ये एकूण 3 सुवर्ण व रौप्य पदक पटकावून संस्थेचे व शाळेचे नाव उंचावले. 1 जुलै 2022 रोजी कामोठे येथे झालेल्या जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धेमध्ये 10 वर्षांखालील मुलांच्या गटात चौथीतील स्पर्श मोरे याने सुवर्ण पदक पटकावले आहे. पिल्लई कॉलेज रसायनी येथे रायगड जिल्हा अथेलेटिक्स असोसिएशनद्वारे आयोजीत  जिल्हास्तरीय अजिंक्य पद व राज्य निवड चाचणी मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे शाळेतील सातवी मधील रोहन काळेल व जान्हवी धापटे यांनी बॉल थ्रो या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंची निवड 9 व 10 ऑगस्टला उस्मानाबाद येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. या सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. या वेळी रयतचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना चव्हाण, क्रीडा शिक्षक सुरज पाटील, हर्षद पाटील उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply