Breaking News

रायगड पोलिसांची होणार आरटी-पीसीआर, अँटीजेन चाचणी

अलिबाग : प्रतिनिधी

पोलिसांमधील कोरोनाचे प्रमाण रोखण्यासाठी रायगड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांची आरटी-पीसीआर तसेच अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये 17 शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचे व्यावसायिक तसेच नागरिकांनी पालन करावे, यासाठी पोलीस प्रशासन दिवस रात्र झटत आहे. वारंवार जनतेच्या संपर्कात आल्याने पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची आरटी-पीसीआर तसेच अँटीजेन चाचणी करण्यात यावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाने  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणार्‍या 168 पोलीस अधिकारी व दोन हजार 228 अंमलदारांची आरटी-पीसीआर व अँटीजेन चाचणी करण्यासाठी 17 शिबिरे मंजूर करण्यात आली आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply