Breaking News

पनवेलमधील फुटबॉल स्पर्धेत कालिना रेंजर विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल फुटबॉल क्लब आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुका व नवी मुंबईस्तरीय टर्फकोर्ट फुटबॉल स्पर्धा रविवारी (दि. 7) झाली. स्पर्धेत कालिना रेंजर हा अंतिम विजेते व बीवायबीएफसी हा संघ उपविजेता ठरला.
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे एमडी व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना कालिना रेंजर हा अंतिम विजेते व बीवायबीएफसी यांच्या झाला. त्यात कालिना रेंजरने बाजी मारली. बेस्ट प्लेअर म्हणून कालिना रेंजर यांच्या डीऑन यास व बेस्ट गोलकीपर स्कॉट यांना विशेष स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाला भाजप कोपरचे अध्यक्ष सुधीर ठाकूर व भारतीय मजदूर संघाचे उलवे अध्यक्ष किशोर पाटील यांचेसह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापक प्रणित गोंधळी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनोज म्हात्रे, हिमांशू वनवेरु व यश वनवेरु यांनी परिश्रम घेतले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply