मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सवाचा कर्जतमध्ये समारोप
कर्जत : प्रतिनिधी
स्पर्धा म्हटली की, जय पराजय होतच असतो. त्याकडे लक्ष न देता आपण आपले ध्येय्य गाठण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शिस्ती बरोबरच जीव ओतून काम करावे, म्हणजे यश निश्चित मिळेल, असा सल्ला मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन आरेकर यांनी कर्जत येथे दिला. मुंबई विद्यापीठाच्या उत्तर रायगड विभागाच्या 55 व्या सांस्कृतिक युवा महोत्सवाचा समारोप कर्जतच्या कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात करण्यात आला. त्यावेळी डॉ. नितीन आरेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. या महोत्सवात कर्जत, पनवेल, खालापूर, उरण तालुक्यातील 29महाविद्यालयातील पंधराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात पनवेल येथील सीकेटी महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पारितोषिके पटकावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा चौधरी यांनी केले. विद्यपीठ समन्वयक डॉ. निलेश सावे, संस्थेचे खजिनदार प्रदीपचंद्र श्रुंगारपुरे, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे, प्राचार्य डॉ. मोहन काळे, जिल्हा समन्वयक डॉ. पराग कारूळकर, डॉ. दीपक गायकवाड यांच्यासह विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेली महाविद्यालये
रांगोळी : अभिनव ज्ञान मंदिर, महाविद्यालय, कर्जत
कोलाज : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
कार्टुनिंग : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
क्लाय मॉडेलिंग : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
मेहेंदी : कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जत
ऑन द स्पॉट पेंटिंग : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
इंडियन लाईट वोकॅल : पिल्लई महाविद्यालय, नवीन पनवेल
इंडियन ग्रुप साँग : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
शास्त्रीय गायन : सेंट विल्फ्रेड फार्मसी महाविद्यालय, पनवेल
क्लासिकल वादन : एमपीएस महाविद्यालय, पनवेल
वेस्टर्न सोलो : सीकेटी महाविद्यालय, पनवेल व पिल्लई महाविद्यालय, न. पनवेल
वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट सोलो : सीकेटी महाविद्यालय, पनवेल आणि कोंकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण
नाट्यसंगीत : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
स्टोरी रायटिंग ग्रुप ब : पिल्लई महाविद्यालय, पनवेल
स्टोरी टेलिंग ग्रुप अ : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
डेबेट ग्रुप ब : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
डेबेट ग्रुप अ : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
एलोकशन ग्रुप ब : पिल्लई महाविद्यालय, पनवेल
एलोकशन ग्रुप अ : एमपीएएस महाविद्याल, पनवेल
मोनो ऍक्ट ग्रुप क : कोंकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण
मोनो ऍक्ट ग्रुप अ : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
स्किट ग्रुप क : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
स्किट ग्रुप अ : सीकेटी महाविद्यालय, पनवेल
माईम रू सीकेटी महाविद्यालय, पनवेल
एकांकिका हिंदी : पिल्लई महाविद्यालय, पनवेल
एकांकिका मराठी : कोंकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण
क्लासिकल डान्स : कोंकण ज्ञानपीठ महाविद्यालय, कर्जत
फोल्क डान्स : केएलई, कळंबोली