उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी
आदिवासी दिनाचे औचित्य साधून उरण, पनवेल, पेण, अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधवांनी चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मांना अभिवादन केले. या वेळी चिरनेर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच आदिवासी बांधवांनी हुतात्मा स्मृतीस्तंभ ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत रॅली काढून उत्साहाले सहभाग घेतला. या रॅलीत भारत माता की जय, कोण म्हणतो वनवासी आम्ही सारे आदिवासी, हुतात्मा नांग्या महादू कातकरी अमर रहे, अशा घोषणांनी आदिवासी बांधवांनी परिसर दणाणून सोडला होता, तसेच चिरनेर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा, नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी आश्रमशाळा चिरनेरचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे, शिक्षक शिवाजी साळूंके, महादेव डोईफोडे, खंडू पिचड, साधना शिंदे, सरोजिनी मढवी, पांडुरंग बडकवडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार, नगरसेवक नंदू कुमार लांबे, नाशिक येथील आदिवासी कल्याण विकास समाजसुधारक गणेश जाधव, शांताराम पवार, एकनाथ वाघे, सुधाम पवार, अविनाश म्हात्रे, माजी सरपंच नागाव हरेश कातकरी, रघुनाथ कातकरी, नामदेव बरतोड यांच्यासह आदिवासी बांधव सहभागी झाले होते.